Views


*पश्चिम बंगाल येथे राजकीय द्वेषातून होत असलेल्या अत्याचार व हिंसेच्या घटना यांचा निषेध म्हणून उमरगा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन!*

उस्मानाबाद/ इकबाल मुल्ला

पश्चिम बंगाल येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत भाजपच्या दमदार कामगिरीवर नाराज होऊन तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो रक्तपात व हिंसाचार माजवला आहे,त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, महिला कार्यकर्त्यांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले, सामान्य लोकांना सुद्धा भाजपला मदत केल्याच्या कारणावरून मारझोड होत आहे, या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी उमरगा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला, याप्रसंगी बोलताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजीराव चालुक्य म्हणाले की, बंगाल मध्ये घडणाऱ्या घटना या उघडपणे भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणाऱ्या असून तृणमूल च्या कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला आहे, हे थांबणे गरजेचे आहे, या घटनांचा निषेध म्हणून आज संपूर्ण देशात भाजपच्या वतीने कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येत आहे, भाजप कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी पक्ष कटिबद्ध असून कार्यकर्त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवावे. तालुका अध्यक्ष कैलास शिंदे म्हणाले की, पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी आमची कोणत्याही पातळीवर उतरून लढा देण्याची तयारी आहे, भाजप हा क्रमांक एक चा पक्ष असून हे सर्व कांहीं कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निर्धास्त पणे पक्षकार्य करावे, जेंव्हा गरज पडेल तेंव्हा पक्ष कार्यकर्त्यांना लागेल ती मदत पुरवण्यासाठी सक्षम आहे. याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजीराव चालुक्य पाटील,भाजप जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे,भाजप मीडिया सेल प्रमुख जयवंत कुलकर्णी, गुंजोटी भाजप चे अध्यक्ष पिंटू साखरे, बाबुराव कलशेट्टी,भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकज मोरे,किरण रामतीर्थे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top