Views


*कोरोना संकटात देखील जिवंत आहे माणुसकी* 
 
कळंब (प्रतिनिधी)

   सध्या जगभरात कोरोणा विषाणू महामारी ने थैमान घातलेले असून संपूर्ण जग हे कोरोणा विषाणू पूढे हातबल झालेले दिसत आहे आशा संकटात संकटं ते म्हणजे लाॅकडाऊन या संकटकाळी माणूस किचे दर्शन घडत आहे ते म्हणजे
     कळंब गांधीनगर येथील एका महिलेचे एक तोळ्याचे गंठण नजरचुकीने कचऱ्यासोबत कचर्‍याच्या गाडीत टाकण्यात आले व त्यानंतर सदरील महिलेने सामाजिक कार्यकर्ते शकील भाई काजी यांना फोन केला आणि शकील भाई ने कचरा गाडीचे चालक व सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने एक तोळ्याचे गंठण शोधून काढले व त्या महिलेला परत केले. त्यावेळी गाडीचे चालक धीरज गायकवाड व सहकारी सफाई कर्मचारी ज्योती गायकवाड यांचा कळंब नगर परिषद स्वच्छता विभाग येथे सत्कार करण्यात आला. व ज्या महिलेचे गंठण होते, त्यांनी सफाई कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ते शकील भाई काजी व दयावन प्रतिष्टान अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला यांच्या हस्ते भेट देण्यात आले व त्यांचा जाहीर सत्कार नगर परिषद स्वच्छता विभाग येथे करण्यात आला. यावेळी स्वच्छता निरीक्षक कल्याण गायकवाड व इतर कर्मचारी उपस्थित होते
 
Top