Views


*आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या तेर येथेल महाराष्ट्र संत विद्यालय येथील आयसोलेशन सेंटर ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय येथील आयसोलेशन सेंटर ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी यांनी भेट देऊन पाहणी करून येथील रुग्णांची विचारपुस केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. 
या आयसोलेशन सेंटरला रुग्णांसाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी बेड दिले आहेत. यावेळी तेरचे मंडळ अधिकारी तिर्थकर, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जिद मनियार, सदस्य रवी चोगुले, बापू नाईकवाडी, रुग्ण कल्यान समितीचे सदस्य जुनेद मोमीन, सुभाष कुलकर्णी, विठ्ठल लामतुरे, मुख्यध्यापक बळवंतराव, प्रविण साळुंके, आदी उपस्थित होते.
 
Top