Views


*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण...*


*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

1 मे महाराष्ट्र दिनाच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कोरोना साथीमुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा झाला. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. 
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभला पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड , जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन,अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, नायब तहसीलदार संतोष पाटील आदीची प्रमुख उपस्थित होती.
 
Top