Views


*उस्मानाबाद शहरातील 89 वर्षांचे कमलाकर गणपतराव अंबुरे आजोबांनी कोरोनावर मात !*

*इच्छाशक्ती व सकारात्मक वृत्तीमुळे शक्य..!*

 उस्मानाबाद(प्रतिनिधी) :-
 
शहरातील नेहरु चौक येथील 89 वर्षांचे कमलाकर गणपतराव अंबुरे आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना आजारावर जबरदस्त इच्छाशक्ती, धैर्य, संयम आणि मुख्य म्हणजे सकारात्मक वृत्ती असेल तर कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. उस्मानाबाद शहरातील नेहरू चौक येथील 89 वर्षांचे कमलाकर गणपतराव अंबुरे गेल्या 22 एप्रिल पासुन 30 एप्रिल पर्यंत 8 ते 9 दिवस शहरातील लक्ष्मी हास्पिटल येथे अँडमिट होते. आजोबांनी कोरोना आजारातून व्यवस्थित झाले असता. आज त्यांना 30 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. 
 
89 वर्षांचे आजोबांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. कारण आजोबांचे वय जास्त असल्याने . मात्र आजोबा न घाबरता. इच्छाशक्ती व सकारात्मक वृत्तीमुळे आजोबा कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. कोरोनाचा सामना कसा करायचा याचे या आजोबांनी उत्तम उदाहरण आहे. या आजोबासारखे तणावमुक्त होऊन उपचार घेतल्यास कोरोनाला सहज पराभूत करता येऊ शकते. 97 टक्के पेक्षा अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करू नये, योग्य ती काळजी घ्यावी असे व डॉक्टरांनी रुग्णांच्या मनामध्ये सर्वात प्रथम न घाबरता इच्छाशक्ती व सकारात्मकता निर्माण करावी असे आवाहन लक्ष्मी हास्पिटल चे डॉ आरुण मोरे यांनी केले आहे .
 
Top