Views

*माजी खा‌.प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत कोविड सेंटरला प्रत्येकी 61 हजार रुपये देणगी अशी एकूण अडिच लाख रुपये देणगी देण्यात आली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना काळात सामाजिक कार्य करत असलेल्या संघटना व उपक्रमांना सहकार्य म्हणून गायकवाड परिवाराच्या वतीने उमरगा शहरातील माऊली कोविड सेंटर, बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर, व श्री.स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळ व ईदगाह कोविड सेंटर या सर्व केंद्रांना प्रत्येकी 61 हजाार रुपये देणगी अशी एकूण अडीच लाख रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, उषा (काकू) रविंद्र गायकवाड, बसवराज वरनाळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे उमरगा, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार उमरगा, विलास भगत, अशोक इंगळे, शरद पवार, साठे, अमर स्वामी, काका गायकवाड, डॉ. विष्णू शिंदे, राजू कारभारी, संदीप चौगुले, योगेश तापसले, अदि उपस्थित होते.
 
Top