Views


*लोहारा तालुका भाजपा यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
 तालुका ग्रामीण रूग्णालयात 18 ते 44 पर्येंतच्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी लसीकरण सेंटर सुरू* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात 18 ते 40 पर्यंतच्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी 5 लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले होते. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा, या ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू होते. परंतु यामधून लोहारा तालुका सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे लोहाच्या शहरातील व तालुक्यातील युवक - युवती, नागरिक, महिलांना लसीकरणासाठी तुळजापूर, उमरगा येथे जावे लागत आहे. शहरात लसीकरण सेंटर सुरू नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील तालुका ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 पर्येंतच्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी लसीकरण सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोहारा भाजपा च्या वतीने निवेदना द्वारे तहसीलदार संतोष रूईकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सेंटर सुरु केले आहे. आज पाहिले असता ऑनलाईनला लोहारा सेंटर दाखवित आहे. यामुळे प्रशासनाचे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आभार मानले आहे.
 
Top