Views


*लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात 18 ते 40 वयोगटातील नागरिक व महिलांसाठी लसीकरण सेंटर सुरू करावे-- भाजपा लोहारा तालुका*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात 18 ते 40 पर्यंतच्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी लसीकरण सेंटर सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपा लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार संतोष रूईकर यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात 18 ते 40 पर्यंतच्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी 5 लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहेत. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा, या ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू आहेत. परंतु यामधून लोहारा तालुका सेंटर वगळण्यात आले आहे. लोहारा तालुक्यात 47 गावे आहेत. शहरात ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे. शहरातील व तालुक्यातील युवक - युवती, नागरिक, महिलांना लसीकरणासाठी तुळजापूर, उमरगा येथे जावे लागत आहे. शहरात लसीकरण सेंटर सुरू नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपस्थित होते.
 
Top