Views


*जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने
 प्राथमिक शाळेत covid 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, लस घेतलेल्यांना श्री.शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने अल्पोपहाराची सोय*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने प्राथमिक शाळेत covid 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, लस घेतलेल्यांना श्री.शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी यांनी सामाजिक भावना जपत अल्पोपहाराची सोय करण्यात आली. यावेळी ग्राम विकास अधिकारी बिराजदार , ग्रा.पं.सदस्य प्रवीण बोंदाडे, ग्रा.पं.सदस्य पंचाक्षरी, अप्पू तांबडे, काशिनाथ लकडे, कोळी सर, कोरे सर व अरोग्य अधिकारी बिराजदार, श्रीमती. पिचे मॅडम, वेदपाठक, यांच्यासह बहुउद्देशिय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावे, यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.
 
Top