*शाहूनगर येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
उस्मानाबाद शहरातील सारनाथ चौक,जेतवन काॅलनी, शाहूनगर येथे आज ११एप्रिल रोजी, महात्मा जोतीराव फुले यांच्या १९३व्या जयंती निमित्त सोशेल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अभिवादन करण्यात आले. यावेळी दादा शिंगाडे(रिपाई उस्मानाबाद जिल्हा सचिव),मारूती पवार,सुधीर गायकवाड, आशोक ओव्हाळ,प्रा.राजा जगताप,बाबासाहेब मस्के आदी उपस्थित होते. यावेळी शाहूनगर येथील फुले,शाहू,आंबेडकर अनुयायांनी कोरोना संदर्भातील नियमाचे पालन करत ठराविक अंतराने महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.