Views




*महसूल, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, प्रशासनाची संयुक्त लोहारा शहरात जनजागृती फेरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना संसर्ग वाढत असल्याने दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत उघडी ठेवण्यास प्रशासनाची परवानगी आहे, या निर्बंधाचे योग्य पालन व्हावे, यासाठी महसुल, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य विभागाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरुन दि.23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता फेरी काढुन जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस ध्वनीशेपकावर कोव्हीड - १९ बद्दल जनजागृती करुन नागरीकांना सहकार्य करण्याचे आव्हान करीत होते. तसेच संबंधित दुकाने, भाजी पाला दुकाने 11 वाजता बंद होतील याची खात्री करून त्यानंतर चौका चौकात खडा पहारा देऊन मनाई आदेशाची पालनावर देखरेख केली जात आहे. तसेच यावेळी बिगर मास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळणारे व मोटार सायकल गाड्यावर ट्रिपल सीट बसुन प्रवास करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. या जनजागृती फेरीत नायब तहसीलदार रणजित शिराळकर, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, उपनिरीक्षक व्ही‌.बी.कदम, नगरपंचायतचे कर्मचारी नवनाथ लोहार, बाळू सातपुते, गणेश काडगावे, श्रीशैल्य मिटकरी, 
पोलीस कर्मचारी सदाशिव पांचाळ, प्रवीण नळेगावकर, किशोर शेवाळे, हनुमंत पापुलवर, विठ्ठल गरड, विजय कोळी अनिल बोडमवाड व होमगार्ड, आदींचा समावेश होता.
 
Top