Views


*लोहारा तालुका कृषी विभागाच्या वतीने मोघा (खु) येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रत्याक्षिक *

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील मोघा खु येथील हनुमान मंदिर सभागृहात दि.22 एप्रिल 2021 रोजी तालुका कृषी विभागाच्या वतीने मास्कचा वापर व सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रत्याक्षिक घेण्यात आले. सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक ओ.एच.पाटील यांनी सादर केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना बिराजदार सर ( उ. वि. कृ. अ . उस्मानाबाद ) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पोखरा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवण चाचणी व बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या सर्व शंकाचे निरसन केले. यावेळी सरपंच सचिन गोरे, पोलिस पाटील कुंडलिक पाटील, गावातील प्रगतशील व इतर शेतकरी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक संपन्न करण्यात आले.
 
Top