Views


*कळंब येथे सुरु केलेले कोरोना तपासणी कक्षाचे ठिकाण तात्काळ बदला ------विकास कदम युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ*

कळंब(प्रतिनिधी)

शहरातील पुनर्वसन सावरगाव, नगरपरिषद शाळा क्रमांक 2, मारुती मंदिराजवळ दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी कोरोना तपासणी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.मात्र सुरू केलेला कोरोना तपासणी कक्ष हा भरवस्तीत आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या पुनर्वसन सावरगाव आणि महात्मा गांधी नगर येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज सकाळपासूनच पुनर्वसन सावरगाव व महात्मा गांधी नगर याठिकाणी कोरोना तपासणी करण्यासाठी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसला.हे कोरोना तपासणी कक्ष भरवस्तीत असेच सुरू राहिले तर पुनर्वसन सावरगाव व महात्मा गांधी नगर कोरोना हॉटस्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही. पुनर्वसन सावरगाव येथे चालू केलेले कोरोणा तपासणी कक्ष तात्काळ इतरत्र हलवावे व नवीन कोरोना तपासणी कक्ष सुरू करतेवेळी देखील ते भरवस्तीत नसावे,याची काळजी घ्यावी असे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व तानाजी चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना दिले आहे..


 
Top