Views




*भाजपा जिल्हा यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने शहरातील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त प्रतीमापुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. व तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतिसूर्य, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव, विश्वरत्न, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त स्मारकास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याहस्ते पूष्पहार घालुन व अभिवादन करण्यात आले. तसेच मिठाई वाटुन आंनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा बुद्धीजिवी प्रकोष्ठ, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य एड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटनीस एड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटनीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, एस.सी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे, तालुकाध्यक्ष राहुल काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, तालुका सरचिटनीस नामदेव नायकल, नगरसेवक प्रवीण पाठक, नरेन वाघमारे, गिरीष पानसरे, यांच्यासह भिमसैनिक, भाजपाचे पदाधीकारी उपस्थीत होते.
 
Top