Views


*जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड.नितीन भोसले यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात आज दोन्ही महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुमारी नालंदा वाघमारे या लहान मुलीने बुद्धवंदना म्हणली. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष अँड.अतुल देशमुख सहसचिव अँड. प्रवीण शेटे, अँड अरुणा गवई,महिला प्रतिनिधी अँड.अश्विनी सोनटक्के,अँड आकांक्षा माने, अँड. कैलास बागल, अँड.युवराज खैरे,अँड.शेषेराव काजळे अँड तात्यासाहेब तावरे, अँड.प्रभात साखरे, अँड भारती रोकडे,अँड मायदेवी सरवदे,अँड बालाजी बिडवे, अँड. आपचे, अँड. ज्योती बडेकर, आदी विधिज्ञ उपस्थित होते.
 
Top