*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार, बहुजन नायक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, प्रा.राजकुमार दलाल, डॉ. संध्या डांगे, डॉ.अविनाश मुळे, डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.राजकुमार नाईक, डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.नरसिंग कदम, प्रा.सुजित मटकरी, डॉ.सुशील मठपती, डॉ.नागोराव बोईनवाड, डॉ.पुरुषोत्तम बारवकर, डॉ.रविंद्र गायकवाड, डॉ.सोमनाथ बिरादार, प्रा. अशोक बावगे, प्रा. उमाकांत महामुनी, प्रा.विठ्ठल चलपते, प्रा.लक्ष्मण पवार, काकासाहेब पाटील, दत्तु गडवे, लालअहमद जेवळे, मशाक कागदी, श्रावण कोकणे आदिं, उपस्थित होते.