Views


 *२० हजाराची लाच घेताना उस्मानाबाद ग्रामीणचा पोलीस गजाआड*


उस्मानाबाद (प्रतिनिधी)

 लॉकडाऊनच्या काळातही उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांची लाचखोरी सुरूच आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांना गुन्ह्यातून काढून टाकण्यासाठी ३० हजार लाचेची मागणी करून २० हजार रुपये लाच स्विकारताना पोलीस उप निरीक्षक श्रीमती शेख यांचे मदतनीस पोलीस शिपाई प्रदीप रामभाऊ तोडकरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकड गजाआड केले आहे .
     तक्रारदार व त्यांच्या आई आणि दोन भावावर पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती शेख यांच्याकडे होता. पो. उप. नी शेख यांचे मदतनीस प्रदीप रामभाऊ तोडकरी, पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांच्या आई आणि एक भावास एम सी आर करून बेल मिळवून देण्यास प्रयत्न/ तपासात मदत केली आणि तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांना गुन्ह्यातून काढून टाकण्यासाठी दिनांक १७ एप्रिल रोजी पंचांसमक्ष ३० हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती २० हजार लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडत गजाआड केले . 
    हा सापळा डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद, डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,प्रशांत संपते,पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी व पो. अंमलदार इफतेकार शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,चालक दत्तात्रय करडे यांनी यशस्वी केला .

    कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.
 
Top