Views


*मदत नव्हे कर्तव्य*
*उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेकडुन
 आळणी ग्रामीण उपकेंद्रास आरोग्य साहित्य भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे कोविड - १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात उपकेंद्र आळणी यांना पी पी किट, मास्क, सँनिटायझर, हँडग्लोज आदि साहित्य उपकेंद्र प्रमुख सी एच ओ डॉ ज्योती वडगावे यांच्याकडे सुपुर्द केल्या. आळणी येथे वाढती रूग्न संख्या पाहता माझे गाव माझी जबाबदारी ही मोहिम आळणी गावात सुरू केली. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यार्या आशावर्कर, डॉक्टर व नर्स यांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणुन उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेकडुन हि छोटीशी मदत केली. याप्रसंगी ए एन एम टेकाळे मँडम, आशावर्कर कालिंदा कदम,नंदा कदम,शोभा गायकवाड, युवराज चौगुले, राहुल पतंगे, लक्ष्मण तिंडे, उपस्थितीत सर्व कर्मचारी स्टाफ यांचेकडे सुपुर्द केला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, विविधकारी सोसायटीचे चेरमन श्रीपाल वीर,सरपंच प्रमोद वीर, ग्रामपंचायत सदस्य विनेाद लावंड, साजन कदम, ग्रामसेवक सुजय मैंदाड, पोलीस पाटील प्रमोद माळी, ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड, शाखा प्रमुख अजित वीर, सुनिल माळी, प्रसाद वीर, शरद लावंड, बब्बलू वीर यांची उपस्थिती होती.
 
Top