Views
*माझा समाज माझं कर्तव्य! उपक्रमांतर्गत कळंब शहरात चर्मकार समाज बांधवांना जीवनावश्यक किटचे वाटप* 
  
*कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील सर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे कीट चर्मकार बांधवाना वाटप करण्यात आले*    
 

  कळंब (प्रतिनिधी)

        राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊन करतेवेळी चर्मकार समाजाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली नाही. संपूर्ण लॉकडाऊनमुळे सर्वच थांबलं!काम धंदे ही थांबले!मग जे चर्मकार समाजाचे बांधव हातावर आणून पोट भरतात त्यांचं काय? त्यांची चूल कशी पेटणार? यामुळे कळंब शहरातील चर्मकार समाजातही अशीच दयनीय अवस्था दिसून आली.त्यांची परिस्थिती हालाखीची होती.त्या गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची कीट देऊन आपली समाजाप्रती असणारी बांधिलकी जपण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांच्या संकल्पनेतून "माझा समाज,माझं कर्तव्य!" हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत चर्मकार समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक कीट देऊन मदत करण्यात आली. कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील सर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे कीट चर्मकार बांधवाना वाटप करण्यात आले . महिनाभर पुरेल एवढे साहित्य किटमध्ये देण्यात आले.
  यावेळी कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल पाटील राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम हे म्हणाले की याही पुढे ज्या चर्मकार बांधवाला जीवनावश्यक वस्तूचे कीट आवश्यकता असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करून किट घेऊन जावेत. तसेच समाजाच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ सदैव तयार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास कदम, दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला, सुहास कदम, तानाजी चव्हाण, पोलीस कर्मचारी फरहान पठाण, अभय गायकवाड, जालिंदर लोहकरे सर,मधुकर माने सर, बाबासाहेब कांबळे सर ,सुधीर कदम,प्रकाश कदम, पुष्पक तूपसमुद्रे ,लिंबराज ठोंबरे,धनाजी भालेराव, यांनी परिश्रम घेतले.
 
Top