Views


*काँग्रेस मराठवाडा प्रशिक्षण समन्वय अध्यक्ष तथा लोहारा पं.स.चे माजी सभापती आसिफ मुल्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील काँग्रेस मराठवाडा प्रशिक्षण समन्वय अध्यक्ष तथा लोहारा पं.स.चे माजी सभापती आसिफ सुलतान मुल्ला वय 50 वर्ष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. यांच्या
निधनाने तालुक्यातुन व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आसिफ मुल्ला यांना छातीत दुखत असल्याने दि‌.25 एप्रिल 2021 रोजी उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखवून पुढील उपचारासाठी स्पर्श हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले. दुपारी 3 वाजायाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. आसिफ मुल्ला यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. हे अभ्यासू व काँग्रेसचे चांगले वक्ते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते. यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.
 
Top