Views


*महात्मा ज्योतीराव फुले यांची १९४ वी जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिक्षणतज्ञ, स्त्री-पुरुष समता, जाती निर्मूलन अशा विविध कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा ज्योतीराव फुले यांची १९४ जयंती मूरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.११) रोजी साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, इतिहास विभागाचे डॉ. अविनाश मुळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. नागनाथ बनसोडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. शीला स्वामी, वाणिज्य विभागाचे डॉ. सुधीर पंचगल्ले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यकमाधिकारी डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सुजित मटकरी, डॉ. सुशील मठपती, सेवानिवृत्त प्रा. परमात्मा कांबळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागोराव बोईनवाड, गणित विभागाचे डॉ.सोमनाथ बिरादार, शिक्षकेत्तर कर्मचारी दत्तु गडवे, लालअहमद जेवळे, दिलीप घाटे, श्रावण कोकणे, आदि उपस्थित होते.
 
Top