Views


*भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने शहरात व तालुक्यात
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतिसूर्य, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव, विश्वरत्न, परमपुज्य डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक आयुब शेख, पं.स‌. सदस्य वामन डावरे, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, व्यवसायिक आघाडी सरचिटणीस बाळु माशाळकर, 
एसी मोर्चा तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सोनकांबळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रगतशील शेतकरी प्रसन्न एंकुडे ग्रमपंचयात सदस्य आडे, मनोज जळकोटे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top