Views


*आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे रुग्णांचा अधिक कल -- डॉ. एस.पी.परशुराम, उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये आयुर्वेदिक क्लिनिकचा शुभारंभ*                             

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 कोरोनाच्या संकट काळात सध्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर सर्वत्र भर दिला जात आहे. आयुर्वेदिक औषध उपचारामुळे रुग्णास कोणताही साईड इफेक्ट होत नसल्याने कमी खर्चामध्ये औषध उपचार घेता येतो. त्यामुळे रुग्णांचा कल दिवसेंदिवस आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वाढत असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एस.पी.परशुरामे यांनी केले. उमरगा शहरातील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयुर्वेदिक क्लिनिकचा शुभारंभ मंगळवार दि.13 एप्रिल रोजी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.सुरेशदाजी बिराजदार होते. यावेळी प्रमुख म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील, शिवसेना युवानेते किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत बाबरे, सुनील माने, पद्माकर हराळकर, डॉ. सचिन शेंडगे, शेंडगे रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.आर. डी.शेंडगे, डॉ.बालाजी जाधव, आयुर्वेदिक वैद्य तुषार देखणे, जी.के.गायकवाड, बब्रुवान माळी, विनायक माने, आदीं, उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.परशुराम म्हणाले की, आयुर्वेदिक उपचार पद्धतीला हजारो वर्षाची परंपरा असून ही उपचारपद्धती बदलत्या काळानुसार बदलत आहे. या उपचार पद्धतीमध्ये देखील शास्त्रीय व अद्यावत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे या उपचार पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य नागरिकांचाही बदलत चालला आहे. अध्यक्ष समारोप प्रसंगी प्रा.सुरेशदाजी बिराजदार म्हणाले की, काळाची पावले उचलून शेंडगे रिसर्च सेंटरने आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु केली. कारण इथे सर्वच प्रकारची अद्यावत सेवा - सुविधा उपलब्ध असून इथल्या नागरिकांना आणखीण एक सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्ल त्यांचे यावेळी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना डॉ.आर.डी. शेंडगे यांनी या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत विविध 125 शिबीरे घेतली असल्याच्या उपक्रमाचा तपशील यावेळी मांडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक गुंडू दूधभाते यांनी केले तर आभार डॉ.स्नेहा सोनकाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजया सोनकाटे, प्रदिप मदने, प्रा. युसूफ मुल्ला, प्रा.डॉ.आप्पासाहेब सोनकाटे, माजी प्राचार्य गोरख घोडके, डॉ.महेश मोटे, प्रा.अशोक दूधभाते, माजी सैनिक खंडू दूधभाते, राघवेंद्र गावडे, सुरज सोनकाटे, मोहन घोडके, आनंद चव्हाण, आकाश माकणे, पवन सुतार, राम म्हेत्रे, व्यंकट चिंचोळे, ओंकार जाधव आदींसह रिसर्च सेंटरचे सर्व कर्मचारी वृंद यांनी पुढाकार घेतला. यावेळी शारीरिक अंतर ठेवून व कोरोनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून कार्यक्रम पार पडला.

 
Top