Views
*शिवसेना, युवासेना, लोहारा व शिव मित्र मंडळ यांच्या सौजन्याने युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने शहरातील शिवनगर व प्रभाग क्रं.6 मध्ये 
स्टिमरचा वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


कोरोना वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक भावना जपत शिवसेना, युवासेना, लोहारा व शिव मित्र मंडळ यांच्या सौजन्याने युवा सेना लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने शहरातील शिवनगर व प्रभाग क्रं.6 मध्ये स्टिमरचा वाटपाचा शुभारंभ तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून तहसीलदार संतोष रूईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, न.प. मुख्याधिकारी गजानन शिंदे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, रघुविर घोडके, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, राजेंद्र माळी, राम चपळे, मंडळाचे अध्यक्ष बालाजी बिराजदार, उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी लोकांना स्टिमरचा वापर कसा करायचा सांगुन शासनाच्या वतीने 18 वर्षा पुढिल सर्वांना लस मोफत देण्यात येणार आहे. हि लस का घ्यावी, व लोकांनी मनातील लसी विषयी गैरसमज दुर करावा, हि लस सुरक्षीत आहे, असे सांगीतले. यावेळी मधुकर भरारे, दत्ता मोरे, किरण पाटील, कमलाकर मुळे, बजरंग माळी, शंकर साखरे, अंकुश चपळे, महेश बसु पाटिल, महेश बाळु पाटिल, किशोर क्षिरसागर, ओमकार बिराजदार, सुज माळी, विक्रम माळी, शिवकुमार बिराजदार व शिवनगर व प्रभाग क्र.6 मधिल नागरीक उपस्थित होते.

 
Top