Views


*सामाजिक बांधिलकी जपत आयडीयल ग्रुप 1987 हायस्कूल लोहारा यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायतला ऑक्सिमिटर दिले भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनास रोखण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लोहारा शहरातील आयडियल ग्रुप ऑफ 1987 (वर्गमित्र) हायस्कूल लोहारा यांच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे व लोहारा नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याकडे आॅक्सीमीटर शहरातील कोरोना पेशंट शोधून उपचार करण्यासाठी देण्यात आले. यावेळी ऑक्सिमिटरचे वाटप करण्यात आले असून या किटच्या सहाय्याने नागरिकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजता येणार आहे. गावची असलेली बांधिलकी मानून आयडियल ग्रुपने कोरोना मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य ह्या ब्रीदवाक्या नुसार गावातील नागरिकांसाठी पल्स ऑक्सिमिटर भेट दिले. आपण ज्या गावात जन्मलो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची सामाजिक भावना समजून आयडियल ग्रुपने ह्या वस्तू ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायत कार्यालयास भेट दिल्या. कोरोनाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत या ग्रुपने ऑक्सिमिटर भेट दिले आहेत. शहरातील इतर ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी तसेच ग्रामीण रुग्णालय आणि शहरात आवश्यक असणाऱ्या ठिकाणी ऑक्सिमिटर, थर्मल गन या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन आयडियल ग्रुप ऑफ 1987 (वर्गमित्र) हायस्कूल लोहारा यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे, बालाजी मक्तेदार, संजय संधीकर, सादिक शेख, दत्तात्रय फावडे, रसुल पठाण, चिदानंद स्वामी, आदी उपस्थित होते.
 
Top