Views


*क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 194वी जयंती निमित्त अभिवादन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक उस्मानाबाद येथे सकाळी 10 वाजता शासनाने दिलेल्या कोविड 19 च्या नियमानुसार महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून व पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी महादेव माळी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय समता परिषद,उस्मानाबाद, 
अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, बलराज रणदिवे जिल्हाध्यक्ष छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती उस्मानाबाद , सचिन चौधरी प्रदेश उपाध्यक्ष VJNT, OBC आरक्षण कृषी समिती, पृथ्वीराज चिलवंत माजी नगरसेवक न. प उस्मानाबाद, रवि कोरे, सुरेश शेळके, सुभाष येळवे, रॉबिन बगाडे तालुका उपाध्यक्ष समता परिषद उस्मानाबाद, शहानवाज सय्यद शहराध्यक्ष समता परिषद उस्मानाबाद, चंद्रकांत गोरे, रविकांत गोरे, बाळासाहेब माळी जिल्हाध्यक्ष वाहतूक संघ, सौदागर गोरे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती उस्मानाबाद कोषाद्यक्ष, दत्ता गोरे माळी, संतोष भोजने जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ उस्मानाबाद, कुणाल निंबाळकर माजी नगरसेवक तथा जिल्हा कार्याध्यक्ष समता परिषद उस्मानाबाद, विकास माळी संचालक जिल्हा शिक्षक पतसंस्था आदींची उपस्थिती होती.
 
Top