Views
*संविधान निर्माते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती साजरी करण्यात आली*

कळंब:-(प्रतिनिधी)

      जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीचा प्रतिक असलेलं जगातलं सर्वात मोठं लिखीत संविधान या संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती सर्व भारतभर कोरोना च्या सावटात परंतु मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरी करण्यात आली. जयंती म्हटलं आला डीजेच्या तालावर नाचणारा युवक वर्ग परंतु या सर्वांना बगल देत "नाचून नाहीतर वाचून" या म्हणीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान कळंब जि. उस्मानाबाद यांच्यावतीने १३० संविधानाच्या प्रतिचे वाटत करून एक आदर्श जयंती साजरी करण्याचा उपक्रम लोकनेते अजित पिंगळे व डिकसळ ग्रा.प.सरपंच अमजद मुल्ला मार्गदर्शनाखाली दयावान प्रतिष्ठान कळंब यांच्या वतीने आज राबवला या उपक्रमा अंतर्गत कळंब शहरात कळंब पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अतुल पाटील, कळंब नगरीच्या प्रथम नागरिक सौ. सुवर्णा सागर मुंडे, राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील, ज्ञानप्रसार मंडळ येरमाळा सचिव अशोक मोहेकर सर, कळंब आगार प्रमुख मुकेश कोमटवार,आयबीएन-लोकमत वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ, दै. दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी शीतलकुमार धोंगडे, दै. सामना चे तालुका प्रतिनिधी अशोक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत, दै. संघर्ष चे तालुका प्रतिनिधी संभाजी गिड्डे, तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, लोकशाही वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी सुरवसे, साप्ताहिक पावन साक्षीचे संपादक सुभाष घोडके, बालरोग तज्ञ डॉ. रमेश जाधवर, प्रा. संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शकील काझी, अतुल गायकवाड, नगरसेविका सौ. सरला सरवदे, नगरसेविका सफुरा काझी, शिवाजी गीड्डे, धनाजी भालेराव सर, बंडूभाऊ बनसोडे, सतपाल बनसोडे,डि.जी. हौसालमल, आपदेव शेळके, पोलिस कर्मचारी फरहान पठाण, प्रशांत राऊत, सचिन गायकवाड, तारेक मिर्झा,अकिब पटेल, मुस्तान मिर्झा आदी मान्यवराना एकुण १३० संविधानाच्या प्रति देऊन भीम जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभय गायकवाड, रणजित चंदनशिवे, तानाजी चव्हाण, राहुल यादव, इम्रान काझी, शफिक शेख, रौफ शेख, शौकत शेख, इम्रान खान, सम्राट गायकवाड, करण गायके, शोयब काझी, फारुख पठाण, मोसिन मुल्ला आदींनी सहकार्य केले.भीम जयंती अशा अभूतपूर्व पद्धतीने साजरा करण्याचे तालुकाभर कौतुक होत आहे.
 
Top