Views




*छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. यंदा महाराजांचा 341 वा राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद मधील बजरंग दल तांबरी विभागातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना कोरोनापासूनच्या खबरदारीसाठी बजरंग दलाकडून मोफत मास्क आणि सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी जमलेल्या सर्व तरुणांनी संभाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या कार्यक्रमास प्रमुख म्हणून संजय देशमुख, अॅड.धीरज कोल्हे, अॅड.निलेश पाटील, अजय बागल, हेमंत देशमुख, पवन वाटवडे, सचिन शिंदे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे, प्रा.विद्यासागर बागल, बजरंग दलचे महेश बागल, बाळासाहेब जगदाळे, ओम नाईकवाडी, रविकांत बागल, अजय कोळी, प्रविण निंबाळकर, अभिजीत मगर, शैलेश पाचभाई, सागर देशमुख, सुजीत मुंडे, प्रतिक गायकवाड, सागर पाटील, विवेक निंबाळकर, प्रतापसिंह शेंडगे, सुजीत वडवले, दिनेश सुर्यवंशी, केदार जाधव, कुणाल शिंदे, आकाश कानडे, आकाश खडके, बबलु चौगुले, हनुमंत जगदाळे, आदि, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बजरंग दलचे प्रमुख महेश बागल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
 
Top