*भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयातून थेट प्रक्षेपित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विजयजी पुराणिक, माजी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे , युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल लोणीकर, महाराष्ट्र संयोजक हर्षल विभांडीक, विभागीय संयोजक हर्षद कराड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद
या ठिकाणाहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून पीएम स्वनिधी या योजनेअंतर्गत धाराशिव शहर व ग्रामीण भागातील शहरात व्यवसाय करणारे फेरीवाले व फुटपाथ व्यवसायिक यांना लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत येणाऱ्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी व त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी या मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र प्रतिष्ठाण भवन येथे ही सुरु करण्यात आले आहे, अद्यापपर्यन्त 160 गरजू लोकांनां याचा फायदा झालेला आहे. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्र.का.स. खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, आनंद कंदले, अमित कदम, संताजी वीर, राहुल साठे, संयोजक कुलदीप भोसले, सुजित साळुंखे, सहसंयोजक सचिन लोंढे, सुरज शेरकर, विशाल पाटील, सुनील पांगुड़वाले, शंकर मोरे, नरेन वाघमारे, अमोल पेठे, शरीफ शेख, प्रथमेश जगदाळे, आशिष मोरे, केदार गव्हाळे, दिनेश लोहार, अनिकेत इंगळे, योगेश ढोबळे, यांच्यासह युवा मोर्चा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.