Views


*बसव प्रतिष्ठाणच्या वतीने वाफेचे मशीन भेट*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने मुरूम ग्रामीण रुग्णालय अंतर्गत कोव्हीड केअर सेंटर साठी पाच, इदगाह,गुंजोटी येथील सेंटर साठी पाच तर उपजिल्हा रुग्णालय उमरगा साठी सहा वाफेचे मशीनचे भेट देण्यात आले. मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी सत्यजित डुकरे, इदगाह येथील स्वयंसेवक तथा समाजसेवक बाबा जाफरी व उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ.प्रवीण जगताप यांच्याकडे बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी वाफेचे मशीन सुपूर्द केले. सदरील वाफेचे मशीन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन सदस्य तथा भाजपा वैधकीय आघाडीचे महाराष्ट्र राज्य सह संयोजक पुणे येथील डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी आपल्या आईच्या पुण्य समरणार्थ समाजसेवक रामलिंग पुराणे यांना भेट दिली होती. सदरील मशीनचा योग्य वापर व जास्तीत रुग्णांना याचा वापर होईल ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी ता.१३ रोजी उमरगा तालुक्यातील मुरूम कोव्हीड केअर सेंटर, गुंजोटी येथील ईदगाह कोव्हीड केअर सेंटर व तसेच उपजिल्हा उमरगा येथे सदरील वाफेची मशीन भेट देण्यात आले. यावेळी मुरूम येथील कर्मचारी, ईदगाह व उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी, विकास शिंदे आदी उपस्थित होते. बसव प्रतिष्ठाण या अखिल भारतीय सामाजिक संघटना लॉक डाऊन फर्स्ट पासून ता.२६ मार्च पासून कोरोना काळात सामाजिक उपक्रम, जनजागृतीचे कार्य व तसेच किराणा सामान किटचे वाटप ही या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले होते.
--------------------------------------------------
समाजाने दिलेली देणगी,वस्तू, भेट हे परत समाजाच्या हितासाठी समाजा पर्यंत पोहचवणे व तसेच त्याचा योग्य रीतीने वापर व्हावे, प्रसिद्धी साठी हे कार्य नसून अशा समाज कार्याची प्रेरणा घेऊन आनखिन मदतीचे हात पुढे यावे हीच भावना समाजसेवकाची, सामाजिक संघटनेची असते -- रामलिंग पुराणे समाजसेवक
 
Top