Views


लोहारा तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी -- मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांनी लोहारा तहसीलदार विजय अधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीसह पिकांचे फार मोठे नुकसान झाले असून प्रामुख्याने उडिद व सोयाबीनची पिके संपूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहेत या वर्षी खरिपाच्या पेरणीसाठी आणलेले बियाणे पूर्णपणे बोगस निघाले त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले नंतर अपुरा पाऊस पडला त्यामुळे पिके कोलमडू लागली होती. त्यानंतर लगेच मुगावर पिवळा हा रोग पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती मुग ही लागल नाही. त्या नंतर उडीद या पिकावरही भयंकर रोग पडला त्यात बर्‍याच शेतकर्‍यांनी आपल्या उभ्या पिकावरच रोटार फिरवला परंतु निसर्गाचे तेवढ्यात समाधान झाले नाही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तर उरली सुरली संपूर्ण पिके पाण्यात अक्षरशः कुजुन गेली आहेत. सोयाबीन तर जागेवरच उगवले आहे. तरी शेतीचे झालेले नुकसान याचे तात्काळ पंचनामे करुन हेक्टरी किमान 25 हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अता गप्प बसणार नाही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी मिलींद बिडबाग यांनी पंचनामे करुन अहवाल पाठऊन देण्याचे आश्वासन दिले व स्वतः स्थळ पंचनामा करण्यास सुरुवातही केली. या वेळी तालुका कृषी अधिकारी मिलींद बिडबाग धानुरी कृषी सहाय्यक नागेश जट्टे, कृषि सहाय्यक आय.डी. पाटील, मनसेचे भरत घोडके, आकाश वाळके, बालाजी साळुंके, विनायक बुरटुकणे, ज्ञानेश्वर वडजे, यशवंत जाधव, नागेश संदीकर, अचुत बुरटुकणे, वसंत जाधव, गोविंद सुर्यवंशी, लक्षण सुरवसे, यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top